Coffee
Coffee
असं म्हणतात पुस्तक आणि कॉफी एक उत्तम combination आहे.पण मला पुस्तक वाचतांना फक्त पुस्तक आणि कॉफी... तेव्हा तर अजुन काही म्हणजे पाप आहे...हा! प्रिय व्यक्ती सोबत गप्पा मात्र चालतात. तर मी खुप वेळ आणि पैसे कॉफी वर खर्च करते and yes I am not guilty. कॉफी म्हणजे कॉफी आहे यार...
तुम्ही दुःखात असा किंवा आनंदात कॉफी तो बनती है! जगाचा कंटाळा आला ना की मस्त कॅफे मध्ये जायचं, कॉफी ऑर्डर करायची..मला तरी त्यात ice cream, caramel आवडत नाही आता ते तुम्ही ठरवा. थांबा थांबा.. लगेच नाही प्यायची...दोन्ही हातात कॉफीमग पक्कं पकडायचा आणि मोठा श्वास घेऊन aroma हृदयात भरायचा.ohhh.. awesome feeling... मग एक एक घोट घेत सगळे tension डोक्यातुन बाहेर फेकायचे आणि कॉफी आत घ्यायची. शांत बसायचं, कॅफे मध्ये theme असतात त्या न्याहाळायच्या, त्यात पण एक मजा असते, एखादं couple बसलेलं असतं...नाही नाही त्यांना observe नाही करायचं (मार खाल उगाच) एक स्वतःशी smile करायची आणि अजुन एक घोट घ्यायचा.
आनंदात असाल तर मित्राला कॉल करायचा किंवा नवऱ्याला ब्लॅकमेल करायचं आणि लांब जायचं...पैसे आपण भरायचे..तरच taste लागेल बरं का! आणि मग हळु हळु गप्पा मारत एक एक घोट घ्यायचा. तेव्हा ज्या गप्पा होतात ना...त्या एका वेगळ्याच जगातल्या असतात..माझे अश्या वेळचे खास पार्टनर म्हणजे Harshil, parag आणि shreya.. खरंच कॉफी म्हणजे कॉफी म्हणजे कॉफी असते यार....
Comments
Post a Comment