Pink and Blue

       काहीतरी घेण्यासाठी मी मेडिकल मध्ये गेली होती. बाजुला एक लहान मुलगा व त्याच्या आई यांमधील संभाषण कानी पडले, "हे पिंक किंडेर जॉय आहे ना ते मुलींचं असतं, तु मुलगी आहे का? नाही ना! मग नको आपल्याला " बापरे ! काय शिकवताय तुम्ही मुलांना या वयात त्यांना ? आणि मोठे मोठे ब्रँड्स पण त्याचं भांडवल करताय..काय बोलणार आता..
       ‎काही दिवसां आधी एका ब्रँड ने सर्वे केला होता. "Run like girl" असं मोठ्या स्त्री पुरुषांना सांगितलं तेव्हा ते पळताना नाटक करुन, कंबर हलवुन, हात हलवुन खुपच घाण expression देत होते. त्याउलट लहान मुलांना आणि मुलींना जेव्हा तसं करायला सांगितलं तेव्हा ते पूर्ण energy लाऊन आणि dedication ने पळुन दाखवत होते. याचा अर्थ लहान असतांना आपल्यात हा भेदभाव नसतोच मुळी, हे आपण, आपला समाज त्या लहान मुलांच्या डोक्यात टाकत असतो. हेच त्यांचे वय आहे जेव्हा त्यांना चांगले संस्कार देऊ शकतो. उद्या हे जग कसं असावं हे आता आपल्या पिढीवर अवलंबुन आहे. खरंच विचार करा plz , नका ना गिरवु चुका...

Comments

Popular posts from this blog

Caterpillar

ती