ती
ती,वय वर्ष 38,19 व्या वर्षी love marriage ,15 वर्षाची मुलगी तरी सध्या एकटी.तसं
म्हणायला नवरा आहे,गोड मुलगी आहे ,असं असून सुद्धा एक भकासपणा आयुष्यात मुरलेला.रोज तोच दिवस,तीच घाई आणि तोच
पसारा पण दुपार झाल्या नंतर एकटं घर अंगावर धावून यायचं.संध्याकाळी घरी आले की
त्यांची कामे पुढ्यात घेऊन दोघे डोके खुपसून बसले की फक्त भूक लागल्यावर तिची
आठवण! आधी नवरा आणि मुलगी यांच सर्व करतांना तिला जबाबदारी ची feeling वैगरे यायची पण
आता सर्व फक्त एक वर्तुळ.एक दिवस झाकावा आणि दुसरा उघडावा.तिने बऱ्याचदा नवऱ्याशी
बोलायचा प्रयत्न केला पण तुला काय कमी आहे असे बोलून विषय संपायचा.
त्यातच
तिच्या आयुष्यात तो आला.
अगदी स्वप्नातला राजकुमार असावा असा नसला तरी वागण्यात रुबाब पाहत रहावा! काही
वर्षा आधी हा आपल्याला भेटला असता तर...असा विचार तिच्या मनाला जरी शिवला नसला तरी
ती नकळत त्याच्या कडे ओढली गेली.त्याच्या कडून तिला काय हवं होतं हे कदाचित ती
सांगू शकली नसती.कारण आता तिच्या शरीरावर कोणी प्रेम करावे अशी तिची अपेक्षा
नव्हती, तिला फक्त अखंड बोलायचं होतं आणि ते ऐकणारे 2 कान आणि 1 हृदय तिच्यासाठी
पुरेसं होता.त्याने नेमके तेच इंद्रिये तिला वाहिलेले.तिने अखंड बोलत राहावं आणि
त्याने ऐकत राहावं.तिला काय आवडतं इथपासून ते तिला कशाचा राग आहे इथपर्यंत तिची
बडबड चालू असायची,जसे ती आयुष्यात पहिल्यांदा बोलत होती.दोघांची एका मागे एक सिगरेट संपत जावी
आणि त्याने
"बोलणं बंद नको करू बाई पण ती सिगरेट विझव् ! चटका लागेल” म्हणावं……
नको म्हणायला हे एकच व्यसन तिला होतं ते सुद्धा फक्त आठवणीत रुळतानां. तीच ते
दिलखुलास वागणं,त्याच्यावर हक्क दाखवणं,एवढं सगळं असून देखील मर्यादेत राहणं या सर्व
गोष्टी त्याला भुरळ पाडायच्या.तिचा एक एक शब्द झेलायला तो उत्सुक असायचा.
पण….त्यांच्याही
आयुष्यात पण हा आलाच
आधी त्याला फक्त तीच बोलणं ऐकू यायच मग हळू हळू त्याला तिची फक्त जळणारी
सिगरेट दिसू लागली, मग डोळ्यात खुपू लागली . अग इथे सिगरेट का पितेस चार चौघात ?आजूबाजूचे
पाहताय आपल्याकडे,माझ ठीक आहे मी पुरुष आहे...अग हळू बोल किती तो आवाज , अश्या एक न अनेक
सुचना आणि मग तिच्या समोर 2 पर्याय ठेवले गेले-
तो किंवा ती.
तिला सोडणं तिच्या साठी खूप काही मोठी गोष्ट नव्हती,तो नव्हता
तेव्हा देखील ती smoke करत नव्हती,पण..आता ती तीच स्वत्व हरवणार नव्हती.त्याने
तिच्यावर प्रेम करावं पण तिच्या गुण दोषांसकट. नेहमी दुसऱ्यांच्या विचार केला,आधी आई वडील मग
नवरा ,मुलगी आणि आता……..या नंतर ती सिगरेट ला हात लावणार नव्हती पण हे आता त्याला सांगावं अशी तिला
गरज वाटत नव्हती....
Mast... Quite deep expressions of emotions.. do keep penning down.. I would love to read more & more....
ReplyDeleteThanks a lot Harshil! I love that you liked it...
Deleteखुप छान। मस्तच�� यापेक्षा ही अजुन काही वेगळे आणि स्वच्छंदपणे तु लिहिशीलच याची खात्री आहे. तुझ्या या नविन उपक्रमाला मन:पुर्वक शुभेच्छा ��
ReplyDeleteधन्यवाद पीयूष ! तुला नक्कीच खूप छान लिखाण वाचायला मिळेल याची मी खात्री देते आणि तसा मी प्रयत्न नेहमी करत राहील.
Delete