थेंबे थेंबे तळे साचे

"थेंबे थेंबे तळे साचे" ही म्हण आपण किती आचरणात आणतो हा वेगळा भाग पण माहीत नक्कीच आहे. एक एक पै साचवला की संपत्ती जमा होते, प्रेम हळु हळु होते, आनंदाचे क्षण एक एक जोडले जातात व संपन्न आयुष्य निर्माण होते.या झाल्या चांगल्या गोष्टी पण same principle is applicable for negative things.
    अजुन एक गोष्ट सांगते. एका बेडकाला जर आपण उकळत्या पाण्यात टाकलं तर तो पटकन उडी मारुन बाहेर येतो पण तेच जर थंड पाण्यात टाकले व तापमान वाढवत गेलो तर जेव्हा पाणी थोडं कोमट होईल तेव्हा तो relax होईल, तापमान वाढत जात असतांना स्वतः ला audjest करेल व शेवटी सहन न होऊन मरेल पण उडी मारुन जीव वाचवणार नाही.आपली परिस्थिती पण तशीच आहे.
    ‎समजा उद्या सकाळी तुम्ही उठल्यावर जर तुम्हाला अचानक कळाले की अरे आपलं वजन 20kg ने वाढलं आहे आपल्या ढेरी चा ढेरोबा झालाय तर तुम्ही पळतच docter कडे जाल पण तेच जर हळु हळु 1-2 वर्षात ग्राम ग्राम ने वाढत गेलं तर आपल्या लक्षात शुद्ध येणार नाही.आज अचानक ₹.10,000 खर्च झाले तर तुम्ही दुःख कराल पण 1 महिन्यात खर्च झाले तर दुर्लक्ष कराल.
    ‎आयुष्य असंच असतं जश्या चांगल्या गोष्टी हळु हळु होतात तश्या वाईट सुद्धा हळु हळु होतात. आता आपलं काम आहे अश्या गोष्टी शोधणे व त्या कश्या रोखव्यात यावर काम करणे.वजन वाढण्याआधी workout चालु करा,खर्च कमी करा,कोणाबद्दल थोडा राग येत असेल तर ती गोष्ट आजच त्या व्यक्तीशी बोलुन relation तुटण्याआधी solve करा. बस बाकी तुम्ही हुशार आहात तुम्ही शोधा 😜.
    ‎ref - book,Follow your Heart
    ‎-मितभाषी

Comments

Popular posts from this blog

Caterpillar

Pink and Blue

ती