Caterpillar

तो भेटतो,आणि पहिल्याच भेटीत आपल्याला आवडू लागतो.त्याचं बोलणं,वागणं,हसणं,बसणं, त्याचा आवाज,त्याचा सहवास अगदी सर्व काही...आणि त्याच्याकडून सुद्धा त्याच भावना प्रतीत होऊ लागल्या की मग तर विषयच संपतो.हळू हळू संवाद वाढत जातो त्यातून भेटी जन्म घेतात.सर्व काही एवढ्या घाईत होतं की " काही दिवसआधी अगदी अपरिचित असलेली व्यक्ती अगदी आपलं संपूर्ण आयुष्य होऊन बसते." पण खरा परीक्षेचा काळ तेव्हा सुरू होतो,जेव्हा अपेक्षा वाढत जातात आणि आधी सर्व गुण संपन्न वाटलेल्या व्यक्ती मधे काही छोटे दुर्गुण सुद्धा असू शकतात हे मान्य करण्यासाठी मन तयार नसते.मग आपण त्या व्यक्तीला समजून घेण्यापेक्षा हे आधी का समजलं नाही या प्रश्नावर अडकून राहतो.घुसमटतो,चिडतो,ओरडतो आणि मग दरी अजूनच खोल होत जात वाढत जाते. खरं त...