ती

ती , वय वर्ष 38,19 व्या वर्षी love marriage , 15 वर्षाची मुलगी तरी सध्या एकटी.तसं म्हणायला नवरा आहे , गोड मुलगी आहे , असं असून सुद्धा एक भकासपणा आयुष्यात मुरलेला.रोज तोच दिवस , तीच घाई आणि तोच पसारा पण दुपार झाल्या नंतर एकटं घर अंगावर धावून यायचं.संध्याकाळी घरी आले की त्यांची कामे पुढ्यात घेऊन दोघे डोके खुपसून बसले की फक्त भूक लागल्यावर तिची आठवण! आधी नवरा आणि मुलगी यांच सर्व करतांना तिला जबाबदारी ची feeling वैगरे यायची पण आता सर्व फक्त एक वर्तुळ.एक दिवस झाकावा आणि दुसरा उघडावा.तिने बऱ्याचदा नवऱ्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तुला काय कमी आहे असे बोलून विषय संपायचा. त्यातच तिच्या आयुष्यात तो आला. अगदी स्वप्नातला राजकुमार असावा असा नसला तरी वागण्यात रुबाब पाहत रहावा! काही वर्षा आधी हा आपल्याला भेटला असता तर...असा विचार तिच्या मनाला जरी शिवला नसला तरी ती नकळत त्याच्या कडे ओढली गेली.त्याच्या कडून तिला काय हवं होतं हे कदाचित ती सांगू श...